वकिलाने दिलेल्या त्या घटस्फोटाच्या कागदावर आपल्या दोघांच्या शेवटच्या सह्या झाल्या
ज्यांच्यात कविता लिहायचो त्या फक्त रद्दीच्या वह्या झाल्या...
तु गेल्यावर अंगणातील तुळस केव्हाच सुकुन गेली ,
मोगरा कोमेजून गेला आणि सदाफुलीने फुलाय़ची आशाच सोडून दिली...
तू गेल्यावर अंगणातील चिमण्यासही दाणे वेचण्यास रस नाही ,
आकाशातील विहंगाला तू ठेवलेल्या वाटीतील पाणी पिण्याची आस नाही ...
तू गेल्यावर मोकळ घरं अगदी खायला उठलं ,
तुज्या पैंजणाची मधुर धून नि बांगड्यांची खण खण
अजूनही ते गीत माझ्या कानात साचलं ...
तू गेल्यावर दुःख आणि दुःखानीच भरून गेलो ,
आनंद सारे हरवून बसलो
विरहाचे नभ होऊन
अश्रुंमधून कोसळत गेलो ..
तू गेल्यावर आयुष्याचे उरलेले दिवस मी मोजत बसलो ..
तू असताना लाभलेल्या क्षणांचे सोनेरीपण मग मी जपत राहिलो ...
!!! समीर !!!